किंजवडे येथे आयोजित आरती स्पर्धेत आरंभ महिला मंडळ कोतापूर प्रथम

309

 

देवगड (गिरीश चव्हाण)

किंजवडे येथे आयोजित आरती स्पर्धेत आरंभ महिला मंडळ कोतापूर प्रथम

सिंधू भार्गव मित्रमंडळ व कलायन चॅरिटेबल ट्रस्ट किंजवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौ मंजिरी निरंजन दीक्षित पुरस्कृत संगीत आरती स्पर्धा ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून किंजवडे येथील श्री देव हरभट्ट स्थानेश्वर मंदिरात, प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाली.सर्व संघांचे सादरीकरण उत्तम दर्जाचे होते,या स्पर्धेत प्रथम क्रमांक आरंभ महिला मंडळ, कोतापुर, दहा हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक सुरभी महिला मंडळ, गुहागर सात हजार व आकर्षक, तृतीय क्रमांक श्री देव विमलेश्वर उत्सव मंडळ, मावलंगे पाच हजार व आकर्षक तसेच उत्तेजनार्थ 1 आदित्येश्वर आरती मंडळ वरवड़े संघांसाठी ४ हजार, उत्तेजनार्थ कोकाकोलाज लांजा ३ हजार रुपये व चषक गौरविण्यात आले, पारंपारिक आरत्यांचे संवर्धन व प्रसार होऊन त्यांचे जतन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.