वैभववाडी पोलिसांची मोठी कारवाई ; चोरटी दारू वाहतुक करणारा कंटेनर पकडला….

105

 

वैभववाडी ( प्रतिनिधी )

वैभववाडी पोलिसांची मोठी कारवाई ; चोरटी दारू वाहतुक करणारा कंटेनर पकडला….

वैभववाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली
आहे. करुळ चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारु वाहतुक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला आहे. बाहेरुन लाकडी भुसा भरलेल्या गोणी आणि आतमध्ये दारु भरलेले बॉक्स एखाद्या चित्रपट स्टोरी प्रमाणे कंटेनरच्या आतील चोरटी दारू वाहतूक करण्यासाठी पर्मनंट केबिन बनविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रणजीत सावंत, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मी प्रसाद हाके, समीर तांबे यांना करुळ चेकपोस्ट येथे तपासणी करीत असताना गोवा येथून कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर मध्ये गोवा बनावटीची चोरटी दारू वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कंटेनर वैभववाडी पोलीस ठाण्यात आणून कंटेनरची तपासणी सुरु आहे.
वैभववाडी पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. गोव्या पासून अनेक चेक पोस्ट असूनही तेथील पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात का आला नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.