दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या कुणकेश्वरच्या पूजेचा मान जिल्हा पोलीस अधीक्षक  व उद्योजक संजय आंग्रे यांना 

32

 

देवगड (प्रतिनिधी)

 

दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या कुणकेश्वरच्या पूजेचा मान जिल्हा पोलीस अधीक्षक  व उद्योजक संजय आंग्रे यांना 

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणारा श्रावणी सोमवार उत्सव श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडणार आहे. यंदाचा दुसरा श्रावणी सोमवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार असून, या दिवशी दुसऱ्या श्रावणी सोमवारी पहिल्या पूजेचा मान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहीकर व उद्योजक श्री. संजय आंग्रे (फोंडा) यांना देण्यात आला आहे.प्रथम पूजेनंतर पहाटे ६ वाजता भाविकांसाठी दर्शन रांगा सुरू करण्यात येणार आहेत. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

दरवर्षीप्रमाणे या श्रावणी सोमवारनिमित्त रा.प.म. देवगड आगार यांच्या वतीने स्पेशल देवगड-कुणकेश्वर एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत विविध नामवंत भजनी मंडळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत.प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तासह पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व सुविधा यांचेही काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली यांनी सांगितले