सावंतवाडी (प्रतिनिधी)
बांदा येथे 10 ऑगस्ट रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
येथे येत्या १० ऑगस्ट रोजी (रविवार) भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पीएम श्री जिल्हा परिषद शाळा, बांदा येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.
स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले असून १६ वर्षांखालील आणि १६ वर्षांवरील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. बुद्धिबळ या बौद्धिक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळावे तसेच नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रोटरॅक्ट रायझिंग युथ बांदा आणि रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बांदा आणि परिसरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी
संकेत वेंगुर्लेकर ९०१११०७५६२, शिवम गावडे ९४२३५०२४७३, बाबा काणेकर ९८२३६६११३३ यांना संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





