वैभववाडी (प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत अभिषेक व रक्तदान शिबिराचे आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै २०२५ रोजी वैभववाडीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 9 ते दुपारी १ या वेळेत ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे रक्तदान शिबिर होणार आहे. दि .28 जुलै रोजी खांबाळे गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
या कार्यक्रमांना वैभववाडी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके आणि युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे .





