मुंबई येथील पर्यटकाला गोवा इथं जीवनदान | युवा रक्तदाता संघटनेचं कौतुकास्पद कार्य

394

सावंतवाडी : सावंतवाडी : गोवा मणिपाल रुग्णालयामध्ये ब्रेन सर्जरीसाठी अॅडमिट असलेल्या विकास अरोरा रा.मुंबई या रुग्णाला अत्यंत तातडीने O+ पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य राघवेेंद्र चितारी, संदिप निवळे, गौरांग चिटणीस, अवधूत गावडे यांनी मणिपाल गोवा रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.देव्या सुर्याजी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच श्री निनाद माणकेश्वर यांनी सहकार्य केले. गोवा पर्यटनासाठी आलेल्या या रुग्णाला दोन ब्रेन स्ट्रोक बसले तेव्हा ब्रेन सर्जरीवेळी तातडीनं रक्तपुरवठा करत जीवनदान दिल्याने युवा रक्तदाता संघटनेचे मुंबई येथील अरोरा यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.