खळबळजनक | शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा होता डाव | पोलिसांनी अगोदरच घातला घाव

245

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावामध्ये प्राथमिक शाळेतीत 3 री ते 6 वि पर्यंतच्या 5 मुली व 1 मुलगा अशा 6 मुलांना अनोळखी इसमांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सावडाव माजी सरपंच दत्तात्रय काटे व शिक्षकांकडून देण्यात आली.

एका चार चाकी गाडीमध्ये मुलांना जबरदस्तीने बसवून त्यांना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मुलांनी आरडाओरडा केली असता त्यांना वाटेतच सोडून ती चार चाकी गाडी व त्यातील व्यक्ती हे पसार झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्यामुळे सावडाव शाळेत शिकणारी ही मुलं व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सर्व मुले सुरक्षित आहेत . पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली होती .कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे , पोलीस निरीक्षक अनिल जाधव ,पोलीस उपनिरीक्षक बंगडे, देसाई तसेच श्वान पथक दाखल झाले होते. दरम्यान या घटनेचा अगदी सूक्ष्म पणे तपास केला जाईल व लवकरात लवकर आरोपीना ताब्यात घेतले जाईल अस देखील उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी संपर्क साधल्यावर सांगितले . दरम्यान पालकांशी आणि नागरिकांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे .