महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ | आमचा सकाळचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच झाला : देवेंद्र फडणवीस

188

मुंबई : २०१९ निवडणुकनिकालानंतर, फडणवीस – अजित पवारांच्या धक्कादायक युतीमुळे वादग्रस्त ठरलेल्या “त्या” सकाळच्या शपथविधीबाबत आता देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट. ”सकाळच्या शपथविधीबाबत आमची, शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. या विषयाबद्दल जर अजित पवार बोलले ; तर मी याबद्दल सविस्तर बोलेन.” असे सूतोवाच करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

मुख्य म्हणजे फडणवीस यांच्या “या” विधानाने; राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेविषयी खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकूण काय तर, निवडणुकीचे वातावरण तापू लागलंय एवढे मात्र खरे. विशेष म्हणजे, उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या “शिंदे-फडणवीस सरकार”च्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे विधान खूप बोलके आहे.