माजी पर्यवेक्षक सुनील घस्ती यांची देवगड हायस्कूलला १०० खुर्च्यांची मूल्यवान देणगी

42

 

देवगड (प्रतिनिधी)

 

माजी पर्यवेक्षक सुनील घस्ती यांची देवगड हायस्कूलला १०० खुर्च्यांची मूल्यवान देणगी

शेठ म.ग. हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक श्री. सुनील दिनकर घस्ती यांनी देवगड हायस्कूलला १०० प्लास्टिक खुर्च्यांची उल्लेखनीय देणगी दिली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही देणगी त्यांनी आपल्या सासरे कै. भास्कर धर्मा हलसवडेकर यांच्या स्मरणार्थ दिली आहे.

 

श्री. घस्ती यांनी नुकतीच अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा येथून मुख्याध्यापक पदावरून नियत वयोमानानुसार ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्ती घेतली. त्यांनी आपल्या एकूण सेवेतून १८ वर्षे शेठ म.ग. हायस्कूलमध्ये काम केले असून त्यातील १६ वर्षे सहाय्यक शिक्षक आणि २ वर्षे पर्यवेक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

 

देणगी सुपूर्त करताना स्थानिक शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शाळेच्या वतीने श्री. घस्ती यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

 

श्री. घस्ती यांची ही सामाजिक बांधिलकी आणि माजी शाळेबद्दलची कृतज्ञता प्रेरणादायक ठरत आहे.