युथ फोरम, देवगडच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड — ॲड. सिद्धेश माणगांवकर अध्यक्षपदी कायम
देवगडमधील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या युथ फोरम, देवगड या संस्थेच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ॲड. सिद्धेश अविनाश माणगांवकर, तर सचिवपदी विनायक उर्फ अमित दीपक पारकर यांची फेरनिवड झाली आहे.
संस्थेच्या कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदी प्रणव मधुकर नलावडे, खजिनदारपदी सागर विलास गावकर, सहसचिवपदी रसिका अनिलकुमार सारंग आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रथमेश अरविंद माणगांवकर यांची फेरनिवड करण्यात आली. सहसचिवपदी ऋत्विक प्रल्हाद धुरी यांची नव्याने निवड झाली.
कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. अपेक्षा सुनील सकपाळ, आकाश सुनील सकपाळ, ॲड. श्रुती सिद्धेश माणगांवकर, प्रणव श्रीपाद पारकर आणि भूषण दातार यांचा समावेश करण्यात आला आहे.
यासोबतच शहर कार्यकारिणीही स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी ओंकार सारंग, उपाध्यक्षपदी जितेश मोहिते, सचिवपदी आज्ञा कोयंडे, सहसचिवपदी विनय पराडकर व शुभम महाजन यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्षित कोयंडे, रुद्रा शेट्टे, राधा जगताप, श्रवण बांदेकर आणि श्रेयस कडू यांचा समावेश आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, युवा उद्योजक सनित आचरेकर, निनाद देशपांडे, परिमल नलावडे, जितेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.