कणकवली ( प्रतिनिधी)
संस्काराच्या शिदोरीने मनुष्य परिपूर्ण होतो, म्हणून संस्कारक्षम व्हा – श्री. के. आर. दळवी
कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये दि.२५ जून २०२५ रोजी दहावी- बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री. के.आर दळवी (शालेय समिती चेअरमन)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रशालेने याही वर्षी 100 % निकालाची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये श्री प्रकाश दळवी (कळसुली शिक्षण संघ मुंबई सल्लागार) , श्री. नामदेव घाडीगावकर (स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन) श्री. रजनीकांत सावंत (स्कूल कमिटी सदस्य) सौ शुभदा देसाई (स्कूल कमिटी सदस्या) मुख्याध्यापक श्री. वगरे व्ही. व्ही.,पर्यवेक्षक श्री. सावळ एस. के. श्री बापू खरात श्री डी.जी.तेली सर, शाळा व्यवस्थापन व शिक्षक पालक संघ समितीचे सदस्य श्री शिवप्रसाद घाडीगावकर, श्री राजाराम चव्हाण, श्री.यशवंत सावंत श्री. रामचंद्र सावंत, सौ.निता गुरव सौ. श्वेता दळवी, पालक श्री. विनोद कदम श्री.रणजीत सुतार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वगरे व्ही.व्ही यांनी प्रास्ताविकात प्रशालेतील विविध उपक्रमाची माहीती दिली. यामध्ये इयत्ता आठवीसाठी नव्याने सुरू झालेला बहुविध कौशल्य अभ्यासक्रम आणि इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड यासारख्या नवीन उपक्रमांची माहिती प्रास्ताविकामध्ये मांडली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला त्यामध्ये वाणिज्य शाखा –
प्रथम क्रमांक – कु. आर्या मनोहर तेली ८२.३३%,
द्वितीय क्रमांक – कु. पूर्वा राजेश घाडीगावकर ८२.१७%,
तृतीय क्रमांक – कु. संघवी गोविंद परब ८०. ६७%
*कला शाखा -*
प्रथम क्रमांक – कु. शुभम सुभाष कदम ६६.३३%,
द्वितीय क्रमांक – कु. विराज राजेंद्र सुतार ६४.००%,
तृतीय क्रमांक – कु. कोमल ज्ञानेश्वर सुतार ६०.३३%प्रथम क्रमांक –
इयत्ता दहावी मधून कु. रतन रणजित सुतार – ९३.४०%,
द्वितीय क्रमांक – कु. कुणाल रमेश वायंगणकर – ९३.००%,
तृतीय क्रमांक – कु. पायल विनोद कदम – ९०.००%.
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्यावतीने वह्या, फोल्डर व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
श्री जयवंत कुलकर्णी उर्फ भाई गुरुजी,बापू खरात, श्री.शिवाजी गुरव,सौ.निता गुरव,सौ. शुभदा देसाई, श्री. शिवप्रसाद घाडीगावकर यांनी आर्थिकव वस्तू स्वरुपात बक्षीस देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला.
या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने शंभर टक्के निकाल लावल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांना श्री. जयवंत कुलकर्णी यांनी प्रोत्साहन स्वरूपात बक्षीस देऊ केले.
श्री. रजनीकांत सावंत ,श्री.नामदेव घाडीगावकर सौ शुभदा देसाई, श्री बापू खरात, सौ नीता गुरव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख उपस्थितामध्ये भाषण करताना श्री. प्रकाश दळवी यांनी उज्ज्वल यश मिळवून गुणवत्तापूर्ण निकाल देणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक या सर्वांचे विशेष कौतुक केले. योग्य निर्णय घ्या व योग्य मित्र निवडा आणि योग्य दिशेने वाटचाल करा असा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणात श्री. के. आर. दळवी यांनी संस्काराने मनुष्य परिपूर्ण होतो संस्काराची शिदोरी मनुष्याला आयुष्यभर योग्य दिशा देते. संस्कारक्षम व्हा असा सल्ला देत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा. पुरुषोत्तम सदाशिव दळवी, कार्याध्यक्ष – मा. सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस- मा. विजय पांडुरंग सावंत, सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा संदेश पाठवला.





