निहाल राणेला मिळाली इस्त्रोला जाण्याची संधी

68

 

वैभववाडी (प्रतिनिधी )

 

निहाल राणेला मिळाली इस्त्रोला जाण्याची संधी

वैभववाडीमधील आचिर्णे गावातील
महाविद्यालयात शिकणारा निहाल प्रसाद राणे याचा ‘वे टू इस्त्रो’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज या संस्थेतर्फे घेण्यात आली होती. निहालने साखरेचा इंधन म्हणून वापर केलेल्या रॉकेटला प्रथम क्रमांक मिळाला.
आचिर्णे गावातील कॉलेजमध्ये १२ इयत्तेत शिकणाऱ्या निहालने यापूर्वदिखील शालेय जीवनात विज्ञान स्पर्धांमध्ये तसेच इस्पायर अवॉर्डसारख्या स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. आता झालेल्या स्पर्धेतील यशामुळे त्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्याला कॉलेजमधून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.