कणकवलीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालिम

51

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवलीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालिम

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील गणपती साना येथील जनावली नदीकाठी सोमवार तालुकास्तरीय रंगीत तालिम घेण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, नायब तहसीलदार मंगेश यादव, गंगाराम कोकरे, मंडल अधिकारी एम.एम.पाटील, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, श्री. कवटकर, एनडीआरएफ टीमचे लिडर नितीन सोकासे, एस. आर. वावलेकर, एस.बी.माळवे, व्ही. बी. चव्हाण, एम. ए. गायकवाड, प्रथमेश गुरसाळे, आर.आर. मेस्त्री, राजेश शिरवलकर, खारेपाटणचे माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, श्री. मानवर यांच्यासह महसूल, पोलीस, पंचायत समिती, नगरपंचायतीचे कर्मचारी ,पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तींमध्ये उद्भवणाºया संकटाचा बचाव करावा, आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याची माहिती एनडीआरएफ टीमचे लिडर नितीन सोकासे व त्यांच्या सहकाºयांनी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.

एनडीआरएफच्या टीमने जानवली नदीत स्पीडबोट फिरवून आपत्तीच्या काळात मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवले.जगदिश कातकर , दीक्षांत देशपांडे,मारुती जगताप, गौरी पाटील यांच्यासह अन्य जणांनी बोटीमध्ये बसून नदीपात्रात कशा पद्धतीने बचाव कार्य कसे करायचे यासंबंधी माहिती जाणून घेतली.