सावंतवाडी (प्रतिनिधी)
कास माऊली मंदिर-रेखवाडी रस्त्याचे भूमिपूजन
कास माऊली मंदिर येथून जाणाऱ्या रेखवाडी रस्त्याचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ मनोहर पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रवीण पंडित, उपसरपंच श्रेया राणे, ग्रामपंचायत सदस्य निकिता कासकर, रुक्मिणी पंडित, पोलीस पाटील प्रशांत पंडित, ग्रामस्थ विश्वनाथ पंडित, जयवंत पंडित, समीर पंडित, विठ्ठल पंडित, नंदकुमार पंडित, दादा भाईप, राजन भाईप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कास गावातील ग्रामस्थांना तसेच नोकरदार वर्गांला गोव्यात येजा करण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे वेळ व पैशाची बचत होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी सरपंच प्रवीण पंडित यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.





