सावंतवाडी (प्रतिनिधी)
भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ५५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड ; आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रोचा समावेश
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ५५ विद्यार्थ्यांची आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रो या नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. कॉलेजमध्यें आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड झाली. यामध्ये होम अप्लायन्सेस बनविणाऱ्या आयएफबीमध्ये १७, जनरल इलेक्ट्रिक १४, वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या केएसपीजी ऑटोमोटिव्ह मध्यें २२ आणि विप्रोमधील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.





