देवगड (प्रतिनिधी)
नारिंग्रे येथे राम नवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिर व गौरव समारंभाचे आयोजन
श्रीराम नवमीच्या पावनदिनी, ६ एप्रिल २०२५ रोजी, कुलसुम अॅग्रो टेक, नारींग्रे व युवा रक्तदाता ग्रुप दहिबाव, बागमळा, नारींग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, देवगड यांच्या सौजन्याने नारिंग्रे येथील राम मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर, मिशन परिचय आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून या शिबिरादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून.ललित नेवे (रक्तसम्राट) – टाटा पॉवर, मुंबई उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९:३० ते १०:३० परिचय व गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते एक या वेळात रक्तदान शिबि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे .





