Home देवगड शिरगांव-रामनगर येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव ; ५ ते ६ एप्रिल रोजी...

शिरगांव-रामनगर येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव ; ५ ते ६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

27

 

देवगड (प्रतिनिधी)

शिरगांव-रामनगर येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव ; ५ ते ६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिरगाव रामनगर गावठण येथील श्रीराम मंदिराचा २५ सावा वर्धापन दिन सोहळा
शिरगांव-रामनगर येथील राम मंदिराचा २५ व्या वर्धापन दिनानिमित्त व रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार ५ एप्रिल व रविवार ६ एप्रिल या कालावधीत शिरगाव येथील श्रीराम मंदिर रामनगर गावठण येथे आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्ताने राम मंदिरात शनिवार, ५ एप्रिल २०२५,स ८ वा. विष्णूयाग, लघुरुद्र, होमहवन व आरती, दु. १२:३० वा.महाप्रसाद, सायंकाळी ६:०० वा. श्री संत बाळूमामा बालभजनी मंडळ,रात्री ९:०० वा. दुर्गादेवी दशावतार नाट्यमंडळ, मालवण यांचे दशावतारी नाटकाचे आयोजन तसेच श्रीरामनवमी उत्सव रविवार, ६ एप्रिल २०२५ सकाळी ७:३० वा.श्री गणेशपूजन व अभिषेक, सकाळी ८:३० वा.श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १२:०० वा.श्रीराम जन्म उत्सव सोहळा, दुपारी १२:३० वा. महाआरती, दुपारी १:०० वा.महाप्रसाद, संध्याकाळी ४:०० वा. श्री पावणादेवी बांदेश्वर ढोलपथक, ६:०० वा. हरिपाठ, २०x२० डबलबारी भजन स्पर्धा रात्री ९:०० वा. बुवा श्रीकांत शिरसाठ व श्री संतोष जोईल आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राममंदिर रामनगर शिरगाव गावठण उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.