देवगड तालुक्यातील चाफेड येथील उबाठा शिवसेनेला मोठा धक्का – सरपंच महेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
देवगड तालुक्यातील चाफेड येथील उबाठा शिवसेनेला मोठा धक्का – सरपंच महेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
देवगड तालुक्यातील चाफेड सरपंच व उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते महेश राणे, शाखाप्रमुख उदय राणे, उपशाखा प्रमुख उमेश राणे, नवनित राणे, शिवसेना महिला संघटक भावना राणे, युवासेना पदाधिकारी मंजिरी राणे, सल्लागार वामन राणे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये नामदेव मोंडकर, प्रकाश मोंडकर, मंगेश राणे, महेंद्र राणे, आनंद मोंडकर, रमाकांत राणे, शशिकांत राणे, परशुराम मोंडकर, हर्षद राणे, रामकृष्ण मोंडकर, रमेश राणे, लवू राणे, दीपक राणे, भास्कर राणे, मनोहर राणे, हेमांगी राणे, सानवी मोंडकर, ज्योती मोंडकर, अस्मिता मोंडकर, वैजयंती मोंडकर, निता मोंडकर, रत्नमाला मोंडकर, मानवी राणे, ज्योती राणे, मयुरी राणे, सुचिता राणे, भारती राणे, सुरेखा राणे, सुनीता मुंडकर, रेशमा राणे, शितल राणे, कीर्ती राणे, निशा राणे, मंदाकिनी राणे, नीता राणे, गौरी राणे, सुनंदा राणे, तानाजी राणे, सुलोचना राणे, रमेश मुंडकर, वैशाली राणे, वंदना राणे, शालिनी राणे, आबा राणे, नीलिमा राणे, प्रसाद मोंडकर, दीपक मोंडकर, चंद्रकांत मोंडकर, प्रदीप मोंडकर, रविकांत मोंडकर, साधना राणे, वासंती राणे, बाळकृष्ण राणे, भाऊ राणे आणि सायली मोंडकर यांचा समावेश होता.
या सोहळ्याला भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, अमित साटम आणि शैलेश शेट्ये हे देखील उपस्थित होते.
भाजपात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना बळकट करण्याची ग्वाही दिली. नामदार नितेश राणे यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना हा प्रवेश भविष्यात पक्षासाठी निर्णायक ठरेल, असे मत व्यक्त केले.