आजारांनी खचून न जाता आनंदी आयुष्य जगा-डॉ सुभाष दिघे

12

 

आचरा-(अर्जुन बापर्डेकर)

    आजारांनी खचून न जाता आनंदी आयुष्य जगा–डॉ सुभाष दिघे

महिला गौरव पुरस्कार मिताली कोरगावकर यांना प्रदान
वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजारांनी खचून न जाता नेहमी आनंदी आणि हसत कार्यरत आयुष्य जगण्याचा सल्ला डॉक्टर सुभाष दिघे यांनी दिला.
फेस्काम सलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ आचराचा स्नेहमेळावा लौकीक सभागृहात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, उपाध्यक्ष सुरेश गावकर,जाकारिएस फर्नांडिस, महिला आघाडीच्या मनाली फाटक, बाबाजी भिसळे,सुरेश ठाकूर,उद्योजक सचिन कुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नागरीक सेवा संघाचा महिला गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मिताली कोरगावकर यांना प्रदान करण्यात आला. जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिक स्वरयात्रे तर्फे दुपारचे सत्र अविस्मरणीय करण्यात आले.