देवगड : समृद्ध आणि आनंदी गाव संकल्पनेचे प्रणेते माजी खासदार बिग्रे. सुधीर सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पहिली जिल्हास्तरीय शालेय थाई बॉक्सिंग व सिलंबम (लाठी-काठी) स्पर्धा बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येथे घेण्यात आली. समृद्ध आणि आनंदी गाव योजनेअंतर्गत खेळांचा विकास, कराटे व स्व:संरक्षण इत्यादी बाबींचा समावेश आहे. सदर स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग व सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशनद्वारा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन अनिरुद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासद संदीप सावंत यांनी केले. उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक विवेक राणे यांनी ब्रिगे. सुधीर सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेतील थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वर्षाखालील मुलांमध्ये 48 ते 51 वजनी गटामध्ये कु. सोहम महेंद्रकर ( आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे )याला प्रथम क्रमांक, 51 ते 54 वाजनी गटामध्ये कु. नित्य पारकर ( बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम क्रमांक व 60 ते 65 वजनी गटामध्ये कु. अमेय राणे ( डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल, ओरोस ) याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

थाई बॉक्सिंग 17 वर्षाखालील मुलींमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडू कु. दिशा पवार हिला 44 ते 48 वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक तर 52 ते 56 वजनी गटांमध्ये कु. वैष्णवी राणे हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सिलंबम याखेळ प्रकारात 14 वर्षाखालील मुलांमध्ये कु. सोहम खवणेकर (सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली) याला प्रथम क्रमांक तर कु. दीप सुतार (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली) याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
सिलंबम या खेळ प्रकारात 14 वर्षाखालील मुलींमध्ये कु. रश्मी रासम (डॉन बॉस्को ओरोस) हिला प्रथम क्रमांक, कु. ज्ञानपरी ठोंबरे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली) हिला द्वितीय क्रमांक तर कु. मनस्वी सुतार (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
सिलंबम या खेळ प्रकारात 17 वर्षाखालील मुलांमध्ये कु. मित मुळये (डॉन बॉस्को ओरोस) याला प्रथम क्रमांक, कु. अमेय राणे (डॉन बॉस्को ओरोस) याला द्वितीय क्रमांक, सोहम महेंद्रकर (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) याला तृतीय क्रमांक, कु. चैतन्य लोट (डॉन बॉस्को ओरोस) याला चतुर्थ क्रमांक, कु. पियुष दळवी (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली) याला पाचवा क्रमांक प्राप्त झाला.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पंच म्हणून सिद्धी पालव, मृणाल मलये,जिशिना नायर व चित्रक्षा मुळये यांनी काम पाहिले. थाय बॉक्सिंग व सिलंबम हे उत्कृष्ट मार्शल आर्ट असून शालेय खेळ आहेत. सिंधुदुर्गातून या खेळाकडे जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्या. विवेक राणे यांनी केले.यशस्वी खेळाडूंना श्रीम. विद्या शिरस, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग, विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग व श्रीम. मनिषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी यांनी अभिनंदन केले.
यशस्वी सर्व खेळाडूंचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक कृष्णा जाधव, सहाय्यक शिक्षक कानडे, शिक्षिका जिशिना नायर, आंबोली सैनिक स्कूल चे शिक्षक देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. अनिरुध्द शिक्षण प्रसारक संस्था मुंबई च्या सेक्रेटरी सौ. सुलेखा राणे यांनी ब्रिगे. सुधीर सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त थाई बॉक्सिंग व सिलंबम चे खेळाडू घडवण्यासाठी योग्य ते सहकार्य बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली करेल असे आश्वासन दिले व यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.





