सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे आणि परिवहन समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे .सुधीर जोशींची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

20

 

देवगड (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे आणि परिवहन समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे .सुधीर जोशींची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

देवगड मधील अंबा बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते सुधीर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत रेल्वे आणि परिवहन सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

करूळ व गगनबावडा घाटातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असून, त्यामुळे कोल्हापूर, गोवा, पुणे, नाशिक, मुंबई यांसारख्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या घाटात बोगदा खणून वाहतूक सुरू करावी

राष्ट्रीय व राज्य महामार्गाला ज्याने जमिनी दिले आहेत त्यांना महामार्ग अलगत व्यवसाय करण्यासाठी तात्पुरती परवानगी उपलब्ध करून द्यावी महामार्गाचे रुंदीकरण करायचे झाल्यास या व्यवसाय करणाऱ्याला कोणती नुकसान भरपाई देऊ नये या अटीवर अशी परवानगी द्यावी

सिंधुदुर्गातील रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या सर्व गाड्यांना येथे थांबा मिळावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. कणकवली रेल्वे स्थानक हे जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांपैकी एक असूनही अनेक एक्स्प्रेस गाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.

कणकवली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर योग्य सुविधा नाहीत. प्रवाशांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो, त्यामुळे येथे प्रकाशयोजना, सुरक्षेच्या सुविधा आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. प्लॅटफॉर्म नंबर दोन वर सरकता जिना व पार्किंगची सुविधा गरजेची या प्लॅटफॉर्मवर सामानासह प्रवास करणे कठीण होऊन बसते प्लॅटफॉर्म नंबर एक वरून प्लॅटफॉर्म नंबर दोन वर पुलावरून यावे लागते.

मुंबई गोवा समुद्री मार्गे प्रवासी वाहतूक सुरू करावे 300 ते 400 प्रवासी असणाऱ्या बोटी मुंबईहून सकाळी सोडून संध्याकाळी पर्यंत गोव्याला पोहोचतील अशी व्यवस्था करावी म्हणजे थोडक्यात जलवाहतूक सुरू करावी अशी मागणी सुधीर जोशी यांनी केली आहे