अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी उद्या देवगड जामसंडे शहरात ; ५ फेब्रुवारी मिठबाव तर ६ रोजी हडपीड मठात येणार

120

 

देवगड (स्वप्निल लोके)

अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी उद्या देवगड जामसंडे शहरात ; ५ फेब्रुवारी मिठबाव तर ६ रोजी हडपीड मठात येणार

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पालखी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर गेली २८ वर्षे पालखी पादुका परिक्रमा कार्यक्रम सुरू आहे .या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वामींच्या पालखी पादुकांचे दर्शन येथील भक्तांना होते. मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची पालखी देवगड जामसंडे शहरात येणार आहे.

तर बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत कुणकेश्वर येथील अभिरुची हॉटेल येथे, त्यानंतर सकाळी १०:३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव येथे येणार आहे. सायंकाळी पाच वाजता तळेबाजार येणार असून रात्री पालखी तळेबाजार येथे मुक्कामी असणार आहे.

गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० ते १०:०० या वेळात श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे ही पालखी येणार आहे सर्व भाविकांनी स्वामीं समर्थांच्या पालखी पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार देवगड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

हडपीड येथून ही पालखी नांदगाव फोंडा तरळे खारेपाटण प्रवासासाठी या मार्गाने मार्गस्थ होणार आहे.