ना. अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

29

 

कणकवली (प्रतिनिधी)

ना. अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा !

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत भेट घेत शुभेच्छा दिल्या.राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अजित पवार यांची निवड होत असल्याने यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अबिद नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक कणकवली तालुका अध्यक्ष निशिकांत कडूलकर, गणेश चौगुले, अनिकेत नाईक उपस्थित होते. यावेळी नामदार अजित पवार यांना शुभेच्छा देताना अबिद नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आता आणखी गतीने होईल असा विश्वास व्यक्त केला.