बांदा (मंगल कामत)
आरोस गिरोबा देवाचा 10 रोजी जत्रोत्सव
आरोस येथील श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.सकाळी श्रींची पुजाअर्चा व अभिषेक होईल.
त्यानंतर केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवाची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोस मानकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.





