दीक्षित फाऊंडेशन’तर्फे १५ व १६ जानेवारी रोजी वाडा  येथे भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन 

16

 

देवगड (प्रतिनिधी)

दीक्षित फाऊंडेशन’तर्फे १५ व १६ जानेवारी रोजी वाडा  येथे भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन 

 

सांगीतिक प्रचार, प्रसार करण्‍यासोबत उदयोन्‍मुख गायकांना व्‍यासपीठ मिळवून देण्‍याच्‍या उद्देशाने ‘दीक्षित फाऊंडेशन’तर्फे १५ व १६ जानेवारी रोजी वाडा (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे श्रीमती नीता नीळकंठ दीक्षित स्‍मरणार्थ भावगीत गायन स्पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे.
श्री दत्त मंगल कार्यालय येथे बाल, कुमार, खुला अशा तीन गटांत स्पर्धा होईल. सहभागासाठी बाल गट : राधिका काणे ७५८८४४९६०५, कुमार गट : हर्षद जोशी ९४२१२६४३७१, खुला गट : प्रियांका वेलणकर ९४२१९३८२३५ या व्‍हॉट्सॲप क्रमांकांवर २५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्‍‍यक आहे. खुल्‍या गटातील प्रथम तीन विजेत्‍यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार व उत्तेजनार्थ २ हजारांचे बक्षीस देण्‍यात येईल. कुमार गटात (पाचवी ते दहावी) अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १०००, ५००; तर बाल गटातील (पहिली ते चौथी) प्रथम तीन विजेत्‍यांना १५००, १०००, ५०० व उत्तेजनार्थ ४०० रुपयांचे पारितोषिक देण्‍यात येईल.

 

सोबत सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रही वितरित करण्‍यात येईल. साथसंगतीसाठी हार्मोनिअम, तबला आणि साईड रिदम एवढीच वाद्ये वापरण्यास परवानगी राहील. संगीत साथीदारांची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात आली आहे. स्‍पर्धास्‍थळी नाश्ता व भोजनाची सोय करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी उपस्थितीची प्रत्यक्ष नोंद करणे आवश्यक आहे. महाराष्‍ट्रासह गोव्‍यातील अधिकाधिक स्‍पर्धकांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.