असलदे शिरगाव येथील बूथला आमदार नितेश राणे यांची भेट
देवगड (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. या मतदान नजिक असलेल्या असलदे येथील बुथला व शिरगाव येथील मतदान केंद्राला लावलेल्या बुथला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली व आढावा घेतला. कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक गुतवर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उस्फूर्तपणे मेहनत घेत आहेत यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.