देवगडात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू ; मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी , मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई स्थित चाकरमानी गावी दाखल

35

 

 

देवगडात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू ; मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी , मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई स्थित चाकरमानी गावी दाखल

देवगड (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली असून सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान देवगड तालुक्यात सुरू आहे काही मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. किंजवडे मतदार केंद्रावर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, भाजप नेते संतोष किंजवडेकर जामसंडे येथील मतदान केंद्रावर नगरसेवक शरद ठुकरुल, माजी आमदार अँड अजित गोगटे, अँड अविनाश माणगावकर यांनी कुटुंबीयांसमवेत तर सामाजिक कार्यकर्ते विनायक शेठ पारकर यांनी वरेरी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

मतदारांना सकाळपासूनच मतदान केंद्रावर ने मतदार बाधवांची ने-आण करण्यासाठी रिक्षा व खाजगी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वृद्ध मतदारांना भाजप पदाधिकारी मतदान केंद्रावर धरून देखील घेऊन जाताना दिसत आहेत. दुपारच्या वेळेस उन्हाचा त्रास होतो म्हणून मतदार केंद्रावर सकाळीच गर्दी दिसत होती. मुंबई स्थित असलेले मतदार बांधव देखील मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गावी आलेले पहायला मिळत आहे.