देवगड : प्रतिनिधी
शिरगाव बाजारपेठेत धाड टाकून २६ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त ; एकावर गुन्हा दाखल
शिरगाव बाजारपेठ येथे धाड टाकून झुडूपात लपविलेली सुमारे २६,४०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू देवगड पोलिसांनी जप्त केली आहे.अवैधरित्या गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी प्रभाकर तुकाराम माळवदे(८०) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून ही कारवाइे रविवारी दुपारी २ वा.सुमारास केली.





