सावंतवाडी (मंगल कामत)
….. तर नोटा बटण दाबून निषेध व्यक्त करा – जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत
कोकण प्रांतातील मराठा बांधवांना आर्थीक दृष्टया मागासप्रवर्गाचे आरक्षण, कोकणाकरीता स्वत्रंत्र वैधानीक विकास मंडळ, सिंधुदुर्ग कृषी बाजार उत्पन समीतीचे सक्षमी करण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नेमणूकांमध्ये 90 टक्के स्थानिक उमेदवरांची भरती, कंत्राटी नोकर भरतीमध्ये 100 टक्के स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्या मराठा महासंघाकडून करण्यात आल्यात. मराठा महासंघाच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवारासह मराठा महासंघ राहील. सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवारांकडून याला अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोटा बटण दाबून निषेध व्यक्त करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.





