शिरगाव बाजारपेठेत धाड टाकून २६ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त ; एकावर गुन्हा दाखल

10

 

देवगड : प्रतिनिधी

शिरगाव बाजारपेठेत धाड टाकून २६ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त ; एकावर गुन्हा दाखल

शिरगाव बाजारपेठ येथे धाड टाकून झुडूपात लपविलेली सुमारे २६,४०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू देवगड पोलिसांनी जप्त केली आहे.अवैधरित्या गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी प्रभाकर तुकाराम माळवदे(८०) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून ही कारवाइे रविवारी दुपारी २ वा.सुमारास केली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिरगाव बाजारपेठ येथील यांनी बाजारपेठेजवळील रस्त्यालगत असलेल्या एका झुडूपामध्ये तेथिलच प्रभाकर माळवदे यांनी गोवा बनावटीची दारू लपवुन ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून देवगड पोलिस स्टेशनचे स.पो.उपनिरिक्षक फकरूद्दीन आगा व पो.कॉ.निलेश पाटील यांनी रविवारी दुपारी २ वा.सुमारास त्या ठिकाणी छापा टाकून २६,४०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली.अवेैधरित्या गोवा बनावटीची दारू जवळ बाळगल्याप्रकरणी प्रभाकर तुकाराम माळवदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास पो.हे.कॉ. महेंद्र महाडिक करीत आहेत.