वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, तिरवडे , नेरले गावात संदेश पारकर याना प्रचारा दरम्यान मिळतोय मतदारांचा चांगला प्रतिसाद
वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, तिरवडे , नेरले गावात संदेश पारकर यांच्या प्रचारा दरम्यान लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जांभवडे येथिल गुरववाडी येथील योगेश गुरव तसेच तिरवडे गावातील जगन्नाथ इंदुलकर येथील बेठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गेली 35 ज्या लोकाना निवडुन दिले त्या माणसांनी मंत्री असताना येथील लोकांना रोजगार उपलब्ध का करून दिला नाही.या भागात पैशाच वाटप करून जर मत मागत असतील तर यावेळी या विभागात फिरू देणार नाही असा निर्णय या बेठकीत नागरिकांनी केली.येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी या तिन्ही गावातून १०० टक्के मतदान असा संकल्प करण्यात आला.. यावेळी त्याच्यासोबत आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, तालुकाध्यक्ष मंगेश लोके, नंदू शिंदे, स्वप्निल धुरी, संजय हिर्लेकर, वैदेही गुरव, बाळा चव्हाण, वर्षा घाटकर, सुभाष कांबळे, संतोष साळुंखे, दिगंबर पाटील, अर्चना राठोड, राजेंद्र गुरव, भिवाजी घाटकर, राजाराम गुरव, दत्ताराम इंदुलकर, दिलीप इंदुलकर,अक्षय इंदुलकर, आकाराम इंदुलकर, पूजा इंदुलकर, दर्शना इंदुलकर, प्राजल इंदुलकर, शैलजा इंदुलकर आणि तिन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.