भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ ११ नोव्हेंबर २०२४ रोजी महिला सभा : सौ नीलमताई राणे यांची प्रमुख उपस्थिती

6

 

देवगड (प्रतिनिधी)

 

भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ ११ नोव्हेंबर २०२४ रोजी महिला सभा : सौ नीलमताई राणे यांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपा देवगड मंडळाच्या वतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी भव्य महिला सभा आयोजित करण्यात आली आहे.

 

या सभेसाठी जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भाजपा प्रवासी प्रभारी महिला मोर्चा संयोजिका श्रीमती सुलक्षणा प्रमोद सावंत आणि भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. उषःकला केळुस्कर यांनी देवगड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी, महिला आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच महिला बूथ अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम तारी कंपाऊंड, हॉटेल प्रपंच शेजारी, देवगड येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे.