सावंतवाडी (प्रतिनिधी)
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात ; महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पादुकांचे आगमन
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले. स्वामींच्या पादुकांचे विधीवत पूजन दीपक केसरकर यांनी सपत्नीक केले. यावेळी निवडणूकीत घवघवीत यश मिळावे असे साकडे देखील घालण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर आदी उपस्थित होते.






