देवगड (प्रतिनिधी)
पुरळ गावात ठीक ठिकाणी संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ होतात बैठका
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज देवगड तालुक्यातील पुरळ भागात मतदारांच्या भेटी घेतल्या त्या भेटीदरम्यान पारकर मराठे यांच्या घरी भेटी दिली. गेली १० वर्ष येथील भागात काहीच प्रगती झाली नाही येथील स्थानिक आमदाराने लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलं. या भागातील तरुणांना गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा रोजगार देऊ शकला नाही आणि स्थानिकांना कोणते प्रकारचे काम देऊ शकला नाही अशा आमदाराला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असा निश्चय या बैठकीत करण्यात आला… भूलथापा मारणारे आमदारापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायमचं उभा राहणारा संदेश पारकर सारखा आमदार पाहिजे असे उदगार जमलेल्या नागरिकांनी काढले
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांना या प्रभागातून शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत संतोष तावडे,मनोहर पुजारे, सुनील डोगरे, राजेंद्र पुजारे, दिनकर पुजारे, सुनिल पुजारे आणी ग्रामस्थ उपस्थित होते.






