देवगड (प्रतिनिधी)
मी आमदार तर तुम्ही आमदार संदेश पारकर यांचा या टॅगलाईनची सर्वत्र चर्चा ; महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा देवगड तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरू
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.सलग दोन दिवस देवगड तालुक्यातील कार्यकर्त्याच्या भेटीगाठी व गावभेट कार्यक्रमावर संदेश पारकर यांनी भर दिला आहे. प्रस्थापितांना घरी बसवून एक वेळ संधी द्यावी असे पारकर मतदाराला सांगून आवाहन करत आहेत. या प्रचारदौऱ्यात मी आमदार तर तुम्ही आमदार या टॅगलाईनची सर्वत्र चर्चा होत आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट, गिरये,रामेश्वर,विजयदुर्ग,पडेल,पुरळ, आदी गावासह आज शिरगाव निमतवाडी येथील संजय राणे आणि जितू राणे यांच्या घरी संदेश पारकर यांनी सदिच्छा भेटी दिल्या.यावेळी निमतवाडी १००% संदेश पारकर यांनाच मतदान करणार असा निश्चय करण्यात आला आहे.मात्र या प्रचार दौऱ्यात मी आमदार तर तुम्ही आमदार या टॅगलाईनची गावागावात चर्चा होत आहे. घराणेशाहीला शिरगाव गावातून हद्दपार करण्यासाठी संदेश भाई सारखा आमदार पाहिजे अशा भावना येथील यावेळी ग्रामस्थांनी दाखवल्या. यावेळी त्यांच्यासोबत संतोष राणे, विनायक सतरकर, जितेंद्र सतरकर, जयेश राऊळ, जगदीश राऊळ, बाळकृष्ण चव्हाण,नाना सतरकर, साहिल राणे, जितू राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






