युथ फोरम , देवगड या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे देवगड एज्युकेशन बोर्डाच्या स्थानिय समिती संचालिका अनुश्री पारकर यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन
युथ फोरम, देवगड या संस्थेच्यावतीने येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन देवगड एज्युकेशन बोर्डाच्या स्थानिय समिती संचालिका अनुश्री पारकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
‘इमोशन्स’ या विषयावर पोट्रेट रांगोळी प्रकारात ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत रेखाटण्यात आलेल्या रांगोळीचे प्रदर्शन ८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० वा. ते रात्री ८ वा. पर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे १५ हजार रूपये, १२ हजार रूपये, १० हजार रूपये, तसेच चतुर्थ व पाचव्या क्रमांकाला प्रत्येकी ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, खजिनदार सागर गावकर, देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष सागर अनभवणे, सहसचिव अॅड. अपेक्षा सकपाळ, रसिका सारंग, चिन्मयी बिडये, अॅड. सौ. श्रुती माणगावकर, आकाश सकपाळ, श्वेता महाडिक, चिन्मया ठाकुर, सौ. स्विटी आचरेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून रांगोळी कलाकार सहभागी झाले आहेत. यावेळी अनुश्री पारकर यांचा सत्कार अॅड. अपेक्षा सकपाळ, सागर अनभवणे यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रणव नलावडे यांच्या हस्ते रांगोळी कलाकारांमधून प्रातिनिधीक सत्कार प्रमोद आर्वी (पुणे) यांचा करण्यात आला. प्रास्ताविक, आभार अॅड. माणगावकर यांनी मानले.