कणकवली शहरातील सुधा वसंत तायशेटे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने वैद्यकीय उपचारा दरम्यान आज ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता निधन झाले.कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली बाजारपेठ मधील तायशेटे मेडिकलचे मालक सुहास तायशेटे, तसेच शरद तायशेटे यांच्या त्या आई होत. पश्चात मुलगे, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे.