स. ह. केळकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी ; कु. साक्षी मिराशीचे यश 

17

 

देवगड (स्वप्नील लोके)

 

स. ह. केळकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी ; कु. साक्षी मिराशीचे यश 

मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे मरीन लाईन्स, मुंबई इथे संपन्न झालेल्या मैदानी स्पर्धेत श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. कु. साक्षी मिराशी हिने देवगड महाविद्यालयात पन्नास वर्षानंतर प्रथमच उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

या अगोदर झालेल्या विद्यापीठाच्या कोकण विभागातील मैदानी स्पर्धेत उंच उडीमध्ये कु. साक्षी मिराशी हिला रजत पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर पुढे उत्कृष्ट कामगिरी करत मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले. या यशाबद्दल साक्षी तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. 

तसेच शिक्षण विकास मंडळ, देवगडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील सर्वांचे अभिनंदन केले आहे.