मालवणी भाषा वक्तृत्व स्पर्धेत कु. वैभवी सतिश परब हिने महाविद्यालयीन गटात यश

4

 

देवगड (प्रतिनिधी)

मालवणी भाषा वक्तृत्व स्पर्धेत कु. वैभवी सतिश परब हिने महाविद्यालयीन गटात यश

कुडाळ मध्ये झालेल्या आकार स्टुडिओ आयोजित मालवणी भाषा वक्तृत्व स्पर्धेत कु. वैभवी सतिश परब हिने महाविद्यालयीन गटात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्फुर्त आणि उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते.

कुडाळ हायस्कूलच्या चि. त्र. खानोलकर ललित कला केंद्र येथे झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे उद्गघाटन मालवणी भाषेचे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण लळीत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. कुडाळ मध्ये झालेल्या आकार स्टुडिओ आयोजित मालवणी वक्तृत्व स्पर्धेत कु. वैभवी सतिश परब हिने महाविद्यालयीन गटात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्फुर्त आणि उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते.

कुडाळ हायस्कूलच्या चि. त्र. खानोलकर ललित कला केंद्र येथे झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे उद्गघाटन मालवणी भाषेचे अभ्यासक डॉ.बाळकृष्ण लळीत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

 

या स्पर्धेत महाविद्यालयीन गटासाठी ‘ कोकणचा इमान उडताहा’, आपली भाषा – लाजाक व्हया कीत्या ? आणि स्त्री पुरुष समानता? – वास्तव हे विषय देण्यात आले होते अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत श्री. स. ह.केळकर महाविद्यालय, देवगडची विद्यार्थिनी कु. वैभवी सतिश परब हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावल्याबद्दल प्राचार्य,डॉ. व्ही.बी. कुनूरे सर,प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारीवृंद यांनी तिचे अभिनंदन केले.