कुणकेश्वरातील चिमुकल्यांनी भरविलेल्या गावठी रानभाजीच्या बाजारात झाली १७ हजाराची उलाढाल

462

 

देवगड (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट २०२४

 

कुणकेश्वरातील चिमुकल्यांनी भरविलेल्या गावठी रानभाजीच्या बाजारात झाली १७ हजाराची उलाढाल

 

कुणकेश्वर जिल्हा परिषद शाळेने केले बालबाजाराचे आयोजन

 

 

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुणकेश्वर नं 1 येथे गावठी रानभाज्यांचा बाजार भरवण्यात आला .कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुणकेश्वर गावचे सरपंच श्री महेश ताम्हणकर , कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री संतोष लब्दे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रामदास तेली , उपाध्यक्ष श्री आनंद हिर्लेकर सर व सर्व सदस्य माजी सरपंच श्री चंद्रकांत घाडी , केंद्रप्रमुख श्रीम भाग्यश्री जोईल अनेक पालक उपस्थित होते . संपूर्ण गावातली कुटुंबांनी मुलांकडील भाजी खरेदी केली . ,पावसाळ्यात येणाऱ्या अनेक रानभाज्या बाजारात होत्या .मुलांना रानभाज्यांचे महत्व समजावे , विदयार्थ्यांना बाजारातील आर्थिक व्यवहाराची ओळख व्हावी असे या उपक्रमाची हेतू होता .सर्व विद्यार्थ्यांनी एकूण १७९८१ रुपयाची भाजी विकली .

सदरचा उपक्रम पार पडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सर्व सदस्य शाळेचे मुख्यध्यापक श्री तात्या लवटे ,पदवीधर शिक्षिका श्रीम अमृता पाटील ,पदवीधर शिक्षक श्री विठ्ठल थिकोले आणि उपशिक्षिका श्रीम पल्लवी ढेरे मॅडम यांनी खूप प्रयत्न केले .सदर उपक्रमात सर्व पालक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला .