कणकवलीत शाळा नंबर ५ वर झाड पडून नुकसान
कणकवली दि २७ जुलै ( प्रतिनिधी)
कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर ५ च्या इमारतीवर झाडाची मोठी फांदी कोसळली. गुरुवारी रात्री ही फांदी शाळेवर कोसळल्यामुळे अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ज्या वर्गखोलीवर ही फांदी कोसळली त्या वर्गात अंगणवाडीची मुले बसतात. अंगणवाडीची स्वतंत्र इमारत असून ती नादुरुस्त झाल्याने त्यात मुलांना बसविण्यास पालकांनीही विरोध केला आहे. त्यामुळे अंगणवाडीचा वर्ग या शाळेत भरविण्यात येतो. फांदी पडली ती तेथील भिंतीला अडकून राहिली. किरकोळ स्वरूपात कौलांचे नुकसान झाले. मात्र यानिमित्ताने अंगणवाडी इमारत तातडीने दुरुस्त करण्याची मागणी तेथील रहिवासियांनी केली आहे.





