कोकण पदवीधर मध्ये लोकसभेचा पराभव विसरून कीर यांना विजयी करू – सुशांत नाईक

112
oplus_131074

कोकण पदवीधर मध्ये लोकसभेचा पराभव विसरून कीर यांना विजयी करू – सुशांत नाईक

देवगड (प्रतिनिधी)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा लोकसभेला झालेला पराभव धक्कादायकच आहे. यामध्ये धनशक्तीचा विजय झाला.
आमची संघटना मजबूत नसल्याने थोड्याफार उणिवा जाणवल्या . यापुढे संघटना बांधण्याचे काम महत्त्वाचे आहे. कामाला लागा शिवसेना संपणार असे म्हणणाऱ्यांना जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही हे दाखवून द्या.तसेच कोकण पदवीधर मध्ये लोकसभेचा पराभव विसरून रमेश कीर यांना विजयी करू असे प्रतिपादन युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी जामसंडे येथील कार्यक्रमात केले.
महाविकास आघाडीच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड तालुक्यात जामसंडे सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या मतदार आभार कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत महाविकास आघाडीचे सर्व नेते अरुण दुधवडकर ,नंदकुमार घाटे, रविंद्र जोगल, जयेश नर, मिलिंद साटम, सायली घाडीगावकर,हर्षा ठाकूर ,अँड प्रसाद करंदीकर आदी उपस्थित होते.