रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांच्या विजयाचा अति आत्मविश्वास आम्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना नडला अशी स्पष्टोक्ती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी जामसंडे येथे केली. महाविकास आघाडीच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड तालुक्यात जामसंडे सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या मतदार आभार कार्यक्रमा दरम्यान केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत महाविकास आघाडीचे सर्व नेते अरुण दुधवडकर ,नंदकुमार घाटे, सुशांत नाईक, रविंद्र जोगल, जयेश नर, मिलिंद साटम, सायली घाडीगावकर,हर्षा ठाकूर ,अँड प्रसाद करंदीकर आदी उपस्थित होते. टेंबुलकर पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामधून चांगले मताधिक्य मिळाले. मात्र जिल्ह्यातील जनतेला नेमकं काय पाहिजे हे समजले नाही सरकारी मेडिकल कॉलेज पेक्षा स्वतःचं मेडिकल कॉलेज आणले असते तर निवडणुकीत विजय सोपं होता असं म्हणायचं का ? असे ही युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर म्हणाले.