कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीमध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट डिजिटल बोर्डचे उद्घाटन
कणकवली दि १६ जून (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांकरिता प्रभावी अध्ययन-अध्यापन व्हावे यासाठी कळसुली शिक्षण संघ, मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली व जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट डिजिटल बोर्डचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी प्रशाला डिजिटल करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. या स्मार्ट बोर्डमुळे त्यात एक पुढचे पाऊल प्रशालेने टाकले आहे.भगीरथ प्रतिष्ठान, झाराप-कुडाळ यांचे अध्यक्ष श्री. प्रसाद देवधर आणि कळसुली शिक्षण संघ मुंबई यांच्या समन्वयाने हा डिजिटल बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला.
यावेळी इ. पाचवी ते इ. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. के.आर.दळवी (चेअरमन – शालेय समिती), श्री. एम. डी. नाईक (सल्लागार -कळसुली शिक्षण संघ, मुंबई), श्री. प्रकाश दळवी( सल्लागार – कळसुली शिक्षण संघ, मुंबई), श्री. रजनीकांत सावंत (सदस्य -शालेय समिती), श्री. शिवाजी गुरव (शाळा व्यवस्थापन समिती – अध्यक्ष), श्री. शिवप्रसाद घाडीगावकर (शाळा व्यवस्थापन समिती – सदस्य), श्री. दीपक राणे (शिक्षक-पालक संघ- सदस्य), श्री. मुरकर इत्यादी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.





