कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांना पितृशोक

36

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली कलमठ सुतार वाडी येथील चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री वय ६५, यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. दुपारनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी,सूना, नातवंडे असा परिवार आहे.

कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा कलमठ ग्रामपंचायत सरपंच संदीप मेस्त्री यांचे ते वडील होत.