राणेंच्या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष ; गेली कित्येक वर्षाची भाजपची प्रतीक्षा राणेंनी केली पूर्ण

10

देवगड (प्रतिनिधी) ४ जून २०२४

राणेंच्या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष ; गेली कित्येक वर्षाची भाजपची प्रतीक्षा राणेंनी केली पूर्ण

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला या निवडणुक निकालमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरी दरम्यान मताधिक्यांची वाढती आकडेवारी पाहून राणे यांनी विजयाच्या दिशेने होणारी वाटचाल पाहता भाजप कार्यकर्त्यांनी देवगड जामसंडे शहरात फटाके वाजवून आपला आनंदोत्सव साजरा केला.

दुपारी देवगड शहरात स्वीकृत नगरसेवक व्ही सी खडपकर , आनंद रामाणे, जीवन पाटील आदी सहकाऱ्यांनी फटाके बाजून जल्लोष साजरा केला. तर राणे यांच्या विजयानंतर जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयासमोर माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून साजरा केला.
यावेळी माजी जि प सदस्या रेश्मा जोशी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, अँड अभिषेक गोगटे, जामसंडे सन्मित्र मित्रमंडळ अध्यक्ष राजा भुजबळ,खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर ,अक्षता घाडी, योगेश घाडी,गौतमी कदम,विश्वास मुंबरकर, अथर्व रामाणे,कमलाकर भडसाळे, आदी उपस्थित होते.

या विजयानंतर भाजपा तालुका
संतोष किंजवडेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात मिळविलेल्या दमदार विजयाने भाजप कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असून गेली कित्येक वर्षे या मतदारसंघात भाजपचा खासदार व्हावा, ही आमची प्रतिक्षा होती ती राणे साहेब या मतदारसंघातून निवडून आल्याने संपली आहे.