देवगड जामसंडे शहरात पाणीटंचाई पाणी विकत घेण्याची वेळ

161

 

देवगड (प्रतिनिधी) 

देवगड जामसंडे शहरात पाणीटंचाई पाणी विकत घेण्याची वेळ

देवगड जामसंडेचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. दहीबाव नळयोजनेची नादुरुस्त पंपिंग यंत्र दुरुस्त झाली. मात्र पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारीत असताना दहिबाव कुपलवाडी सडा येथील पाईपलाईन फुटली. व पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लावला.त्यामुळे पुन्हा एकदा देवगड वासीयांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकीकडे पंपिंग यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. कोल्हापूर येथून दुरुस्तीचे काम करणारे कारागीर दाखल झाले. त्यांनी शनिवारी पंपिंग यंत्रणा दुरुस्त केली. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू होईल असे वाटत असतानाच दहिबाव नळ योजनेवरील कुपलवाडी सडा भागातील पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फुटली. त्यामुळे देवगड जामसंडे शहर वासियांचा पाणीपुरवठा सुरू होण्याआधीच थांबला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा करता येणार नसल्याने पुन्हा एकदा नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस देवगड जामसंडे वासियांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.