ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्या मंदिर येथे प्रथमच २४ वर्षांनी संपन्न झाला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
बांदा : (मंगल कामत) १४ मे २०२४
ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे चा २००४ दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा २४ वर्षा नंतर त्याच दहावीच्या खोलीत पुन्हा एकदाबेंचवर बसून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत गेट-टुगेदर म्हणजे स्नेह मेळावा साजरा केला यामध्ये २४ वर्षानंतर एकत्र आलेल्या सर्व बालमित्र मैत्रिणींच्या भावनांना उजाळा देण्यात आला तसेच आनंदाच्या वातावरणात गुरुवर्यांनी कशाप्रकारे घडवले आणि आज आपण कुठपर्यंत आहोत याचेही सर्वांनीच शिक्षकांच्या सानिध्यात दिवस घालून आभार व्यक्त केले
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा याप्रमाणे पूजनीय गुरुजनवर्ग आणि त्यांनी घडवल्यामुळेच आज प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी चांगलं जीवन जगत असल्याबाबतचा प्रत्येकाचा अनुभव ऐकून अक्षरशः शिक्षकांच्या डोळ्यात डोळे भरून आले ओठवणे येथे श्री रवळनाथ विद्या मंदिर चे रोपटे कैलासवासी दामले काका यांनी लावले आणि त्यानंतर त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले या आनंदाच्या क्षणी आनंद ने प्रत्येक जण भाऊक झाला. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री देसाई सर व इतर सहकारी शिक्षक यांनी देखील २००४ च्या दहावीच्या वर्गात त्यावेळी आणि आज कोणत्या प्रकारे काम चालते तसेच विद्यार्थी घडवणे हेच आमचे ध्येय असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेशी आपली नाळ कायमच जोडून ठेवावी असे मुख्याध्यापकाने सांगितले तर हा ओठवणे शाळेतील पहिला स्नेह मेळावा असून या सर्व विद्यार्थ्यांकडे बघून एक आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे श्री कांबळे सर ,राऊ ळ सर धोंगडे सर, सावन मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले
यावेळी माजी विद्यार्थ्यांपैकी २००४ च्या बॅचमधील सुमारे २५ विद्यार्थी आज उपस्थित होते या आनंदाच्या क्षणी सर्वांचे डोळे आनंद ने पाणवले होते सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारनंतरही चालू होता सायंकाळी समारोपाने या कार्यक्रमाची सांगता झाली. दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही यामध्ये ठेवण्यात आला होता.२००४ च्या दहावीच्या विद्यार्थ्याने आपले शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करीत शिक्षकांनी आपल्याला शिकवल्याचे आणि आज कसे घडलो याचे शब्दशः वर्णन केले स्नेह ह मेळावा याची डोळा याची देही या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एकत्र येऊन पाहता आला यातच सर्वांचे भाग्य आहे असे समारोपाच्या शेवटी आभार प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.






