सावंतवाडी : चराटा सगम हॉटेल शेजारी अल्पवयीन मुलगी रस्त्यावर फिरत असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली होती. यावेळी भोसले कॉलेजचे शिक्षक प्राचार्य गजानन भोसले, तेजस नाईक, अभिषेक राणे यांनी सदरच्या अल्पवयीन मुलीला सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केले.
सदरची मुलगी विसंगत माहिती देत असल्याने तिच्याशी संवाद साधून माहिती मिळविणे अडचणीचे होत होते. तिने आपले नाव श्रेया बसवराज हडपत असे सांगितले होते. पोलीसानी तपास केला असता तिचे वडील बसवराज पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर मुलीला पोलिसांनी मुस्कान मोहीमे अंतर्गत त्यांच्या स्वाधीन केले. सावंतवाडी शाळा नंबर चार मध्ये सदरच्या मुलीने आजच प्रवेश घेतला होता. मुलीचा आजचा शाळेचा पहिलाच दिवस होता.
यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, गणेश कराडकर, आनंद यशवंते, महिला पोलीस गौरी ताम्हाणेकर उपस्थित होते.





