सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा “स्वदेश दर्शन योजना टप्पा – II” मध्ये सहभागी करून पर्यटनाच्या दृष्टीने नवीन DPR बनवावा आणि स्वदेश दर्शन योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी, जेणेकरून सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळेल.
यासाठी आज दिनांक 06 फेब्रुवारी 2023 रोजी खासदार – शिवसेना सचिव. विनायक राऊत यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री.जी कृष्ण रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्रीय पर्यटन मंत्री.जी कृष्ण रेड्डी यांनी सुद्धा त्वरित महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याला लवकरात लवकर DPR केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले.





